Something worth reading.. and remembering
भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला अालेला नाही.
मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी बांधून ठेवता येत नाही. त्याला गरुडपंखांचं वरदानही लाभलं अाहे.
एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणे, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणे, त्या धडपडीतला अानंद लुटणे अाणि दुर्दैवाने ते स्वप्न भग्न पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसर््या स्वप्नामागनं धावणं हा मानवी मनाचा धर्म अाहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं !
----
'अमृतवेल'
वि. स. खांडेकर
0 Comments:
Post a Comment
<< Home