Thursday, January 25, 2007

अजून काय हवं?

Note: To read this post, your browser needs to be able to display Devanagari fonts.

अॉफीसमध्ये प्रचंड काम होते. त्यामुळे घरी मी दमुनच अालो होतो. रात्री सुप पीऊन अाणि सफरचंद खाऊन झाल्यावर मी कॉम्पवर जरा टी. पी. करत होतो. खरंतर फ्रेंडस पण अॉनलाइन नव्हते. त्यामुळे जरा बोअर झालो होतो. लोकांना बोलायला माणसे लागतात. मला माझी बडबड ऐकायला माणसे लागतात :)

मग मी अॅज युजुअल गाणी लावली. अाजकाल मी जगजीत सिंग मनापासून ऐकतोय. गझल्स मला खुपच अावडतात. पण कधी शांतपणे ऐकली नाहीत. पण बॉस, मानना पडेगा! एकेक शब्द असा सुरेख वापरलाय की तबियत एकदम खुश पण होते अाणि अावाजतला दर्द काळजाला भिडतो. डोळ्यांसमोर सीन उभा राहतो. "तेरे बारेमें जब सोचा नही था, मैं तनहा था मगर इतना नही था", "शामसे अांख में नमी सी है", "मुस्कुराकर मिला करो हमसे" सप्तसुरांचा खजिनाच उघडल्यासारखं झालं होतं.

नेमकी अशावेळेला मला भुक लागते. मग जुने दिवस अाठवले. अाणि मी एक टोस्ट सॅंडविच बनवले. व्यवस्थित पुदिना चटणी, बटर अाणि टोमॅटो अाणि काकडी वापरून. मला खरंतर बीट पण वापरायचे होतं पण घरात नव्हतं. एन. टी. एस. च्या क्लासला रुपारेल कॉलेजला जायचो. रुपारलेलच्या बाहेर एक सॅंडविच स्टॉल होता. माझी अशी अॅम्बिशन अाहे की एक दिवस मी त्याच्यापेक्षा चांगले सॅंडविच बनवीन. :)

अाता सॅंडविच बरोबर कॉफी पण हवीच! मग नेसकॅफे पण बनवली. फर्स्टक्लास सॅंडविच, कॉफी अाणि जगजीत सिंगच्या गझल्स. मन एकदम भुतकाळात रमलं. कर्जतला राहत असताना रात्री अंगणात गाणी ऐकत बसायचो. तेव्हा अाई बाबा अाणि मी अाणि कधी काही फ्रेंड सर्कल असायचं. अाता एकटा ऐकतो. तेव्हा लता-रफी-मुकेश-तलत ऐकायचो. अाता जगजीत ऐकतो.

दिवस परफेक्टपणे घालवायची माझी एक कल्पना अाहे. संध्याकाळी घरच्यांबरोबर झकास मराठमोळे जेवण, नंतर बडीशेप किंवा सुपारी. अाणि मग अाइसक्रीम किंवा मिल्कशेक किंवा कुल्फी किंवा कॉफी ह्याच्याबरोबर शांत गाणी एन्जॉय करावी.

अजुन काय हवं?

0 Comments:

Post a Comment

<< Home