Wednesday, November 29, 2006

एक चेहरा ...

Note: To read this post, your browser needs to be able to display Devanagari fonts.

एक चेहरा ...

एक चेहरा असा साजरा
डोळ्यांपुढून जाइना
विरून गेली रात्र सारी
चैन काही पडेना

निमिषार्धाची भेट ती
पण क्षणामध्ये हे जुळले नाते
सेकंदांच्या चिमटीमध्ये
जग माझे गुरफटले होते

कळेन अाली कोठून चपला
करून गेली वाताहात
प्राण अडकला श्वासामध्ये
नजरेने केला त्या घात

नाव नाही पत्ता नाही
शोधू तिला कुठे अाता
भेटेल का ती परत मजला
जुळतील का अामच्या वाटा

भेटली जर का सांगीन तिजला
जीव माझा गुंतलाय ग
एक फुंकर फक्त घाल
काटा खोल रुतलाय ग

---- सुमोद

0 Comments:

Post a Comment

<< Home