Saturday, January 27, 2007

प्रवचन - शंकर अभ्यंकर

Note: To read this post, your browser needs to be able to display Devanagari fonts.

हिंदुस्थानात असताना शंकर अभ्यंकरांचे प्रवचन ऐकण्याचा योग अाला. झालं असं की बाजुच्या शाळेच्या पटांगणात दहा दिवस त्यांचे "वंदे मातरम" ह्या विषयावर प्रवचन होणार होते. सुरुवातीला मी खरं म्हणजे निरुत्साहीच होतो. म्हटलं वंदे मातरम ह्या विषयावर दहा दिवस काय बोलणार. अाणि त्यातून अापल्याला भारताचा अाणि वंदे मातरमचा इतिहास तर माहितच अाहे.

पण झालं असं की तेव्हाच अाजोबा पण अाले होते. अाणि शेजारच्या काकू अाणि माझा मित्र मंदार सारखा अाग्रह करत होता की "अरे, चल तर खरा. चांगलं सांगतात ते". मग एका दिवशी अाजोबांना घेऊन मी पण प्रवचन ऐकायला गेलो.

अाणि गंमत म्हणजे मला ते प्रवचन एव्हढे अावडले की मी दुसरया दिवशीही गेलो. खरंच, एखादी गोष्ट नुसतीच माहीत असणे अाणि तिचे विविध पैलू समजावून घेणे ह्यात जमीनअस्मानाचा फरक असतो. शंकर अभ्यंकरांनी वंदे मातरमचा इतिहास समजावून सांगितला. त्याचे स्वातंत्र्यलढ्याशी असलेले नाते सांगितले. अाणि एवढे सांगताना त्यांनी लोकांचा रस कायम ठेवला. विद्यावाचस्पती काय असतो ते मला ह्या प्रवचनांनंतर समजले. साधा पण अत्यंत नीटनेटका पोशाख, स्वच्छ वाणी, स्पष्ट अाणि खणखणीत उच्चार, भाषेवरती वादातीत प्रभुत्व, शुद्ध भाषा (त्यांनी सगळे प्रवचन मराठीत केले), अाणि प्रसन्न व्यक्तिमत्व. खरंच, अाज अापण घरी अालो की टी. व्ही. वरच्या त्या बंडल अाणि बोगस सिरियल्स बघत बसतो. त्याऐवजी अशा कार्यक्रमांना अापण का जात नाही? का स्वत:च्या देशाविषयी अाणि संस्कृतीविषयी जाणून घेणे "अाउट अॉफ फॅशन" अाहे?

0 Comments:

Post a Comment

<< Home