Wednesday, February 07, 2007

मिळेल तुला व्हॅलेंटाईन

मिळेल तुला व्हॅलेंटाईन

वेळ काळ स्थळाने कधी थांबवले मनाला
व्हॅलेंटाईनसाठी पापण्यांमध्ये पकड एका क्षणाला

अभ्यासात लक्ष देऊनसुदधा प्रेम करता येते
परीक्षेत पहिले येऊनसुदधा मन गुंतत जाते
मन हेच व्हेरीएबल समिकरणांमध्ये, सुत्रांमध्ये
अव्यक्त भाषेतील अस्पष्ट इतिहासामध्ये

तीने रुबाब दाखवला म्हणून खट्टु थोडंच व्हायचं?
अरे एक फुल कोमेजंल तर, दुसरं अाणून द्यायचं
वर्षभर वाट पाहून काय मुहुर्त शोधणार का?
अरे तू झोपून राहिलास, म्हणून सुर्य नाही उगवणार का?

प्रेमाच्या भाषेत व्याकरण नेहमीपेक्षा वेगळं असतं
'ईश्श' काय अाणि 'इलू' काय, हे प्रकरणंच अागळं असतं
पत्र कसलं लिहितोस लेका? मोबाईल नाही वापरत?
रिंगटोनवरून ह्रदयाची धडधड तिला नाही सांगत?

मित्रांना काय सांगतोस, बावळटपणा करू नकोस
प्रेम तु करतोयस ना? , मग त्यांचं मत विचारू नकोस
अरे प्रेमच सगळ्यात फेअर असतं, प्रेमच सगळ्यात फाईन
थोडा कमी रडलास तर मिळेल तुझी व्हॅलेंटाईन

अामीर अाणि जुही सारखं फक्त पिक्चर मध्येच होतं
'पारो नाहीतर चंद्रमुखी' हे प्रेमात थोडंच चालतं?
द्राक्षांपासून वाईन बनायला लागतो थोडा वेळ
खरं प्रेम असेल तर धैर्य धर, हा नाही भातुकलिचा खेळ

बाप्पाला साकडं घालून हा प्रश्न सुटणार कसा?
शिवधनुष्य उचललंच नाहीस, तर तु बाण चालवणार कसा?
हिंमत कर, अाणि विचार एकदा तिला
फार तर फार नाही म्हणेल, कसला शिकवा आणि कसला गीला?

खरं प्रेम शोधायचं असतं, काट्याकुट्यांतून वादळवाटांतून
चालायचं असतं अापल्याच मनाच्या विखुरलेल्या तुकड्यांवरून
येईल बघ ती तुला बघून, सगळी दुनिया टाकून मागे
व्हाल व्हॅलेंटाईन एकमेकांचे, अायुष्याभरासाठी तुम्ही दोघे!

--- सुमोद
०६ / ०२ / २००७

0 Comments:

Post a Comment

<< Home