Thursday, October 02, 2008

एका गाण्याच्या निमित्ताने

"ये वादियां ये फ़िज़ाएं बुला रही हैं तुम्हें

खामोशीयों की सदायें बुला रही हैं तुम्हें"

 

"आज और कल" ह्या जुन्या कृष्णधवल चित्रपटातील हे गाणे मला खूप आवडते. सुनील दत्त आणि बेबी नंदा ह्यांच्यावर चित्रीत झालेले हे प्रेमगीत अत्यंत मृदु आणि भावनाप्रधान आहे.

थोडीशी पार्श्वभुमी द्यायची झाली तर सुनील दत्त हा बेबी नंदाला बरे करण्याच्या प्रयत्नात असतो. माला सिन्हा ही चालू शकत नाही. परंतु तिचा आजार हा बहुतांशी मानसिक आहे. आणि ह्या गाण्याच्या निमित्ताने सुनील दत्त तिला असे सांगतोय ह्या निसर्गातील अनेक सुंदर गोष्टी ज्या तिच्या सौंदर्याच्या याचक आहेत, त्या तिला बोलवत आहेत. कारण त्यांना तिच्या सौंदर्याचे थोडेसे तरी दान हवे आहे. पण त्यासाठी तिने उठून ह्या सगळ्या गोष्टींकडे गेले पाहिजे.

"Youtube" वरून मी हा "video" घेतला आहे. आशा आहे की तुम्हाला पण हे गाणे आवडेल.

ह्या गाण्यातले हे कडवे ऎका,

"तुम्हारी झुल्फ़ोंसे खुशबु की भीख लेने को (२)

झुकी झुकी सी घटायें बुला रही हैं तुम्हें"

ह्या कडव्याच्या सुरुवातीला बेबी नंदा तिचा आधीच छान असलेला केशसंभार हलकेच व्यवस्थित करते आणि मंद हसते. कॅमेरा आकाशातील काळ्या ढगांकडे जातो. ह्यातून दिग्दर्शकाला जे सुचवायचे आहे ते शब्दांत मांडणे म्हणजे त्या कल्पनेचा अपमान आहे. ते फ़क्त भावनेला जाणवले पाहीजे.

संदर्भ : जर तुम्ही मराठी नाटके वाचली असतील किंवा पाहीली असतील तर तुमच्या असे लक्षात येईल की हा चित्रपट पु. ल. देशपांडे ह्यांच्या "सुंदर मी होणार" ह्या नाटकावर आधारीत आहे. "आज और कल" हा चित्रपट दिग्दर्शीत केल आहे वसंत जोगळेकर ह्यांनी.

http://en.wikipedia.org/wiki/Aaj_Aur_Kal

0 Comments:

Post a Comment

<< Home