Wednesday, August 06, 2008

आपण सारेच अश्वत्थामा

भालावरती जखम वाहती
ठसठसणारी न सुकणारी
घेऊन फिरतो आपण आपली
ललाटरेषा न पुसणारी

कर्पूरासम रात्रंदिवसी
विवंचना त्या जाळत जाई
किती शोधता कुठे मिळेना
मणी सुखाचा खुणवत राही

दैवाचा हा खेळ असे जरी
आपण बांधील आपल्या कर्मा
वर्तुळामध्ये आयुष्याच्या
आपण सारेच अश्वत्थामा

- सुमोद










2 Comments:

At 3:20 AM, Blogger प्रशांत said...

सुरेख कविता.

 
At 2:09 PM, Blogger Soaktastic said...

nice ... very nice

 

Post a Comment

<< Home