तेव्हा मी फार बोलत नाही
तेव्हा मी फार बोलत नाही
काही जण म्हणतात मी फार फास्ट बोलतो
काही जण म्हणतात मी फार जास्त बोलतो
जास्त काय अाणि फास्ट काय निमित्त असतात शब्द मात्र
मनाने मनाचे ऐकले की चांदणी होते हर एक रात्र
पण कधी कधी रात्र सरता सरत नाही, काळोख होऊन राहतात अब्द
अबोल भावनांचे अश्रु वाहतात नि:शब्द
मी अगदी गप्प असतो ... अशावेळी काही कळत नाही
फार सांगायचे असुन सुद्धा, तेव्हा मी फार बोलत नाही...
सुमोद
४ मार्च २००७
0 Comments:
Post a Comment
<< Home