गणेशचतुर्थीनिमित्त एक कविता
गणेशचतुर्थीनिमित्त एक कविता
सरला श्रावण बघता बघता वाट भाद्रपद मासाची
अाली जन्मचतुर्थी देवा तुझीच अामूच्या राजाची
वसलो अाम्ही दूर जरी दाटूनी येती भाव मनी
अारती, प्रसाद, मोदकांच्या किती गोड त्या अाठवणी
तव अाशिषे सर्व मिळाले मजला अाता काय हवे
तुझाच सेवक जन्मांतरी मी, हेच ऋण मम सदैव द्यावे
त्याच भावे तुला पुजितो गौरीनंदना अाद्यस्थळी
अशीच सेवा घडो हातुनी हीच प्रार्थना चरणतळी
- सुमोद ०९/११/२००७
1 Comments:
मस्त कविता
Post a Comment
<< Home