Friday, December 21, 2007

आजीच्या राज्यात

अाजीच्या राज्यात सगळं िकती छान होतं
दंवबिंदू पडलेलं गुलाबाचं पान होतं

शाळेला उशीर चालत होता दांडी मारणं पण माफ होतं
पोटात खोटं दुखलं तरी मन मात्र साफ होतं

सर्दी खोकला झाला की चहा आल्याचा प्यावा मस्त
चार बिस्कीटे ग्लुकोजची त्याबरोबर करावी फस्त 

फरशीवरच घड््याळ काढावे सात अाठ खेळताना
पेशंस पण समजून घ्यावा बेरीज वजाबाकी शिकताना

सातच्या अात घरात यावं देवासमोर िदवा असावा
शुभंकरोती म्हणताना थालिपीठाचा वास यावा

भीती वाटली अंधाराची तर हळूच आजीच्या गोधडीत शिरावं
मायेच्या पांघरूणात स्वत:ला गु्रफटून घ्यावं

अाजीच्या राज्यात सगळं िकती छान होतं
दंवबिंदू पडलेलं गुलाबाचं पान होतं

0 Comments:

Post a Comment

<< Home