नवरात्री
नवरात्री म्हणजे गरबा , दांिडया , मस्ती, धमाल. नक्कीच, पण नवरात्री म्हणजे नऊ रात्री देवीच्या आरत्या , अंबाबाईला घातलेले साकडे , आजीअाजोबांबरोबर घेतलेला तीर्थप्रसाद अािण ह्या सगळयाची दहा िदवसांनी होणारी सांगता म्हणजे दसरा , विजयादशमी. ह्याच िदवशी प्रभु रामचंद्रांनी रावणाचा वध केला . पांडवांनी शमीच्या झाडात ठेवलेली शस्त्रे काढून घेतली. चांगल्याचा वाइटावर , सुष्टाचा दुष्टावर विजयाचा हा दिवस.
लहानपणी अाम्ही दसरयाच्या िदवशी आपटयाची पाने सोने म्हणून वाटायचो. वह्यापुस्तकांची पुजा करायचो. प्रत्येक कारागीर ह्या िदवशी अापल्या साधनांची पुजा करतो. मला स्वत:ला ही प्रथा खूप आवडते. मी अजुनही ती पाळतो. गरब्याची मस्ती घेताना अारतीची श्रद्धा पण जपली की पुस्तकांची पुजा करण्यामागची भावना लक्षात यायला वेळ लागत नाही.
सर्वांना िवजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Labels: Dasara, Navratri, Vijayadashami
1 Comments:
छान लिहीलय . तुम्हाला ही दसय्राच्या शुभेच्छा.
पण लिहिलेलं एकदा तपासून घेत जा. उगाचच D दाबल्यानं असं होतं ।
आशा जोगळेकर
Post a Comment
<< Home