Sunday, October 28, 2007

कोजािगरी

अश्विन शुद्ध पौर्णिमा हा मराठी लोकांसाठी एक छान छोटासा सण. गणपती अापल्या गावाला गेलेले असतात. दसरयाचं सोनं लुटून झालेलं असतं. िदवाळीला अजून अवकाश असतो. अॉक्टोबर हीट हळूहळू अोसरून नोव्हेंवरच्या गुलाबी थंडीची चाहूल लागत असते. तेव्हा चांदण्या रात्रीत मोकळ्या अंगणात किंवा गच्चीत अाप्तेंष्टांबरोबर गप्पा मारत कोमट गरम मसाला दुधाचा अास्वाद घेत पडायचं म्हणजे एक सण हवाच !

लहाणपणी कोजािगरी म्हटली की हे सर्व यायचंच. अामचा सगळ्या मित्रमैत्रिणींचा एक मस्त ग्रुप होता. त्यापैकी फक्त समीरच्या घराला गच्ची होती. त्यामुळे तो इन जनरलच अामचा फेवरीट हॅंगिंग स्पॉट होता. मग कोजागिरीच्या रात्री अाम्ही सगळे तिकडे जमायचो. अाधी गाण्यांच्या भेंडया नाहीतर "खांब खांव खांबोळी" खेळायचो. अामची पेटंट डिश म्हणजे भेळ. कारण ती करायला एकदम सोपी. कॉफी समीरची अाई करून द्यायची. शाळेला सुट्टी लागलेली असल्यामुळे अाम्ही सॉलिड दंगा करायचो.

अाज इतक्या वर्षांनंतर सुद्धा सगळं अगदी काल झाल्यासारखं वाटतं.

तुम्ही जर कोजािगरीची कथा वाचलीत तर त्यात असे म्हटले अाहे की ह्या रात्री लक्ष्मी घरोघरी जाऊन "को जागर्ती" म्हणजे अापल्या कर्तव्याला कोण जागे अाहे हे पहात असते. अािण जर तुम्ही जागरूक असाल तर ती तुमच्यावर प्रसन्न होते. मी ह्या गोष्टीचा अर्थ असा घेतो. "Opportunity knocks only once.. and sometimes that is just once in a year".

जुन्या कथांतून नवीन संदेश घेतले की त्या प्रथा जुनाट वाटत नाहीत. आिण अाफ्टरअॉल , Some things never go out of fashion.

Labels:

0 Comments:

Post a Comment

<< Home